

Sunday 12th April 2026 At 10:00 A.M.






जर या गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील, तर तुम्ही एकटे नाही आहात.
Overthinking हा तुमचा स्वभाव नाही... ती एक सवय आहे जी बदलता येते.
तुमच्या मनाला शांततेकडे नेणाऱ्या या मोफत Webinar मध्ये आजच सहभागी व्हा.

मला नेहमी भविष्याची काळजी वाटायची. एखादी गोष्ट होण्याआधीच मी तिचे दहा वाईट परिणाम मनात तयार करायचे. या Webinar नंतर मला समजलं की समस्या परिस्थितीत नव्हती, तर माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत होती.


मला वाटायचं माझी समस्या आळशीपणा आहे. पण या Webinar मध्ये समजलं की मी काम टाळत नव्हतो... मी प्रत्येक गोष्टीचा इतका विचार करत होतो की सुरुवातच होत नव्हती.


माझं मन प्रत्येक छोट्या गोष्टीला मोठी समस्या बनवत होतं. कुणी काही बोललं किंवा एखादी छोटी चूक झाली की मी दिवसन्-दिवस त्याचाच विचार करत राहायचो. या Webinar ने मला स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवलं.


मी सतत विचार करत होतो आणि स्वतःलाच दोष देत होतो. "मी असा का आहे?"हा प्रश्न नेहमी पडायचा. पण आता मला समजलं की Overthinking हा माझा स्वभाव नाही.


रात्री झोपायला गेल्यावर माझं डोकं जास्तच Active व्हायचं.शरीर थकलं असायचं...पण विचार थांबत नव्हते.या Webinar मधल्या काही गोष्टींनी मला मनाकडे वेगळ्या पद्धतीने बघायला मदत केली.


या Webinar मधली एक गोष्ट माझ्यासाठी Game Changer ठरली.मी नेहमी म्हणायचो,"मी अशीच आहे." पण पहिल्यांदाच समजलं की Overthinking ही ओळख नाही...


सततच्या विचारांमुळे ताण वाढतो, झोपेवर परिणाम होतो आणि शरीर थकल्यासारखं वाटू लागतं.

छोट्या गोष्टींचा जास्त विचार केल्यामुळे गैरसमज वाढतात आणि नात्यांमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होतो.

प्रत्येक निर्णयाचा अति विचार केल्यामुळे संधी हातातून निसटतात आणि प्रगतीचा वेग कमी होतो.

चुकीची भीती आणि सततचा विचार यामुळे योग्य वेळी कृती करणं कठीण होतं.

स्वतःबद्दलच्या शंका, भीती आणि नकारात्मक विचार हळूहळू वाढू लागतात.

मन भूतकाळ किंवा भविष्यकाळात अडकून राहतं आणि वर्तमान क्षणाचा आनंद घेणं कठीण होतं.


जेव्हा मन सतत विचारांनी भरलेलं असतं, तेव्हा योग्य निर्णय घेणं कठीण होतं.या Webinar मध्ये तुम्हाला कोणत्या विचारांकडे लक्ष द्यायचं आणि कोणते विचार सोडून द्यायचे हे समजू लागेल.त्यामुळे मानसिक गोंधळ कमी होईल आणि निर्णय घेणं अधिक सोपं वाटू लागेल.

Overthinking अचानक सुरू होत नाही.त्यामागे काही विशिष्ट परिस्थिती, भावना किंवा विचारांची साखळी असते.या Webinar मध्ये तुम्ही तुमच्या Overthinking चे Hidden Triggers ओळखायला शिकाल, ज्यामुळे बदलाची सुरुवात करणे सोपे होईल.

जेव्हा मन भरधाव धावू लागतं, तेव्हा स्वतःला पुन्हा शांत आणि स्थिर कसं करायचं याची एक सोपी पद्धत तुम्ही शिकाल.ही पद्धत विचारांच्या अंतहीन चक्रातून बाहेर पडायला आणि वर्तमान क्षणात परत यायला मदत करेल.
मनाला शांतता, स्पष्टता आणि अधिक नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी या Webinar मध्ये जाणून घ्या.